请输入您要查询的百科知识:

 

词条 Draft:Patanjali Samadhipaad
释义 {{AFC comment|1=This is the English language Wikipedia. Please write articles in English. Thank you. --Hammersoft (talk) 21:42, 22 November 2018 (UTC)}}

पतंजलींचे समाधिपाद

पतंजलीच्या योग्सुत्रानुसार योगसूत्रांचे चार अध्याय आहेत .

१.प्रथम अध्याय – समाधिपाद

२ द्वितीय अध्याय – साधनपाद

३ तृतीय अध्याय – विभूतीपाद

४ चतुर्थ अध्याय – कैवल्यपद

समाधिपाद

अथ योगानुशासनम् II

समाधिपादात मध्ये पतंजलीनी सर्वात प्रथम योगाचे स्पष्टीकरण केले आहे .

योग श्र्चित्तवृत्तिनिरोध:I

योग म्हणजे मनसतत्वाला म्हणजेच चित्ताला निरनिराळी रूपे धारण न करू देणे . तेव्हा एकाग्र झाल्यावर पुरुष आपल्या शुद्ध स्वरूपाला स्थिर होतो .इतर वेळी एकाग्रतेहून वेगळ्या अवस्थेत द्रष्टा ह्या वृत्तीशी एकरूप होऊन जात असतो तद्रूप बनत असतो . वृत्तीहि पाच प्रकारची असते असे ते सांगतात. त्यांपैकी काही क्लेशकारक असतात तर काही क्लेशकारक नसतात .

प्रमाण- विपर्यय –विकल्प –निद्रा –स्मृतय: II

या पाच वृत्ती पुढीलप्रमाणे आहेत – सत्य , ज्ञान (प्रमाण) , भ्रम (विपर्यय) , शब्दजन्य , भ्रम (विकल्प) , निद्रा आणि स्मृती .

जेव्हा कोणत्याही दोन प्रत्यक्ष अनुभवांत विरोध उभ्दवत नाही तेव्हा त्यांना आपण प्रमाण म्हणतो . तीन प्रकारचे प्रमाण असत्तात .

प्रत्यक्षनुमानागमा: प्रमाणानि I I

प्रत्यक्षप्रमाण किंवा प्रत्यक्षानुभव - जे काही आपण पाहतो किंवा अनुभवतो ते . इंद्रियांना भ्रमात पडणारी कोणतीही गोष्ट न घडल्यास मला जे दिसते व अनुभवास येईल ते प्रमाण मानले पाहिजे . मि हे जग पाहतो ,अनुभवतो . हाच जगाच्या अस्तित्वाचा पुरेसा पुरावा आहे याला म्हणत्तात प्रत्यक्ष प्रमाण .

अनुमान किंवा तर्क

जेव्हा तुम्ही एक चिन्ह पाहता त्या चिन्ह वरून त्याने सुचविलेल्या वस्तूचे तुम्हाला ज्ञान होते त्यालाच अनुमान किंवा तर्क असे म्हणतात . जसे दुरून धूर पाहून तिथे अग्नी आहे असे तुम्हाला ज्ञान झाले याला म्हणतात अनुमान प्रमाण .

आप्तवाक्य

आप्तवाक्य म्हणजे ज्यांना सत्याचा मूर्त साक्षात्कार झालेला आहे अशा योग्यांची प्रत्यक्ष अनुभूती .आपण सगळेच ज्ञानप्राप्ती साठी धडपडत असतो . पण तुम्हाआम्हाला यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात व तर्काच्या कंटाळवाण्या प्रक्रीयाच्या द्वारे ज्ञानापर्यंत पोहोचावे लागते .पण विशुद्ध सत्वाचा योगी या सगळ्यांच्या पलीकडे गेलेला असतो . त्याचे शब्द प्रमाण असतात , कारण ज्ञानाचा त्याला स्वतःच्या अंतर्यामीच साक्षात्कार झालेला असतो .

ईश्वरप्रणि धानाद्वा II

ईश्वराच्या भक्तीमुळे देखील समाधीलाभ होतो .

क्लेशकर्मविपकाशयैरपरामृष्ट: पुरुषविशेष ईश्वर: II

सुत्रार्थ: - दुःख ,कर्म , कर्मफल व वासना यांचा उपसर्ग नसलेला विशिष्ट पुरुष म्हण्गे ( परम नियंता ) होय .

पातंजलयोगाचे तत्वज्ञान हे संख्य तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे .फक्त संख्यात ईश्वराला स्थान नाही व योगात ईश्वराचे अस्तित्व स्वीकारलेले आहे . पण योगात ईश्वरासंबंधी सृष्टीकर्तुत्व इत्यादी कल्पनांचा उल्लेख केलेला नाही . योगदर्शनात ईश्वर हा सृष्टी करता मानला नाही . वेदांच्या मते ईश्वर हा सृष्टीकर्ता आहे . ज्या अर्थी विश्व हे सुसंबंध आहे . त्याअर्थी ते एका इच्छाशक्तीची अभिव्यक्ती असलीच पाहिजे .

योगदर्शनाचे पुरस्कर्ते ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एक वेगळाच मुद्दा पुढे मांडतात ते म्हणतात –

तत्र निर्तीशयं सर्वज्ञत्वबीजम I

सुत्रार्थ – सर्वज्ञता , इतरांमध्ये बिजरूपातच असते ति ईश्वारामध्ये अमर्याद असते .

मन नेहमी अति विस्तीर्ण व अति क्षुद्र या दोन टोकांच्या अवस्था मध्ये फिरत असते . तुम्ही परिमित ‘देशा’ ची ( स्थालाची ) कल्पना करू शकता , पण त्या कल्पनेतूनच अपरिमित ‘ देशा’ चेही तुम्हाला ज्ञान होते . डोळे मिटून एखाद्या लहान ‘ देश ‘ ची कल्पना करा . या लहान देशा रुपी वर्तुलाबरोबरच ज्याच्या भवताली एक असीम विस्तार असलेले दुसरे वर्तुळ देखील प्रत्यास येईल . असेच ‘ काळाचे ‘ हि आहे . मानवत ज्ञान हे केवळ बिजरूपातच असते . पण त्या स्वल्प ज्ञानाचा विचार करताना त्याच्या बरोबरच अनंत ज्ञानेश्वरी ज्ञानाचाहि विचार करणे भाग आहे . म्हणून आपल्या मनाच्या घडनिवरूनच स्पष्ट होते की ज्ञान हे अनंत आहे ; या अनंत ज्ञानालाच योगी “ईश्वर” म्हणतात .

随便看

 

开放百科全书收录14589846条英语、德语、日语等多语种百科知识,基本涵盖了大多数领域的百科知识,是一部内容自由、开放的电子版国际百科全书。

 

Copyright © 2023 OENC.NET All Rights Reserved
京ICP备2021023879号 更新时间:2024/11/10 13:13:11